
सध्याच्या महामारीचा, विविध क्षेत्रातील उद्योग व अर्थकारणावर बऱ्यापैकी प्रभाव आपण अनुभवत आहोत तसेच जे विद्यार्थी एसएससी बारावी नंतर शिक्षण सोडून व काही पदवी घेऊनही गावातच बेरोजगारीला सामोरे जातानाचे आपण अनुभव आहोत अशांसाठी आत्मनिर्भरतेने स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने तंत्र व कौशल्य विकास पायाभूत ठेवून ग्रामक्षेत्रातील मुलभूत सुविधाचा विचार करून सक्षम रोजगार व अर्थकारणाचा विकास करण्याच्या दृष्टीने “दी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित शिवराम उर्फ दाजी गुळगुळे तंत्र व कौशल्य विकास केंद्र आचरा” आपल्या न्यु इंग्लिश स्कूल संस्थेच्या कॅम्पस मध्ये सदरचा उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने सध्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ तंत्रज्ञ्यांच्यां मार्गदर्शनाने सुरू करीत आहोत, त्यासाठी मा.श्री राजन गुळेगुळे (स्वर्गीय दाजी गुळगुळे यांचे नातू) व गुळेगुळे कुटुंबीय यांच्या मोलाच्या सहकार्याने “दि आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई” यांच्या अखत्यारीतील १) सेमी माध्यम (न्यू इंग्लिश स्कूल)स्थानिय कमिटी २) नामदेव शंकर कावले इंग्लिश माध्यम स्थानिय कमिटी ३) आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज स्थानिय कमिटी* यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर उपक्रमांतर्गत खालील कोर्सेस, नाममात्र शुल्क आकारून, लवकरच सुरू करण्याचा मानस आहे तरी भविष्यात आपण सर्व ह्यांचा लाभ घ्याल यात शंका नाही.

कोर्सेस खालीलप्रमाणे
अ) इलेक्ट्रिकल ट्रेड:-
१)A C रिपेरिंग

२) सेंट्री फंगल पंप रिपेरिंग

३) घरगुती रेफ्रिजरेटर रिपेरिंग

४) मिक्सर ग्राइंडर रिपेरिंग

५) ट्रांसफार्मर आणि मोटर वायरिंग

६) गॅसलाईन पावर जनरेटर

७) इंडस्ट्रियल वायरिंग इन्स्टॉलेशन

८) घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशन

ब) इलेक्ट्रॉनिक ट्रेड
१) मायक्रो ओव्हन रिपेरिंग

२) वॉशिंग मशीन रिपेरिंग

३)( कॉम्प्युटर) युपीएस रिपेरिंग

क) ऑटोमोबाईल ट्रेड:-
१) मोटर सायकल रिपेरिंग

इत्यादी कोर्सेस च्या शाखा कार्यरत आहेत.
वरील सर्व उपक्रम मातृसंस्था (Apex body) दी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई मार्फत राबविण्यात येत आहेत.