
धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई ,संचलित ‘ शिवराम उर्फ दाजी महादेव गुळगुळे तंत्र व कौशल्य विकास केंद्र आचरा ’, उद्घाटन सोहळा दि .०६ ऑक्टोबर २०२३ मान. नामदार श्री नारायणराव तातूजी राणे साहेब केंद्रीय (लघु, सूक्ष्म आणि मध्यम) उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते वाजत गाजत पार पडला
सन्मा. श्री राजन सोमनाथ गुळगुळे यांच्या बहुमूल्य आर्थिक व तांत्रिक योगदानाने तथा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर ,नवी दिल्ली (NSDC) मान्यता प्राप्त यांच्या माध्यमातून आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई, यांच्या सहकार्यातून व मान्यतेने ‘ शिवराम उर्फ दाजी महादेव गुळगुळे तंत्र व कौशल्य विकास केंद्र आचरा ’ या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.