
सन्मा. श्री बस्त्याव फ्रान्सिस फर्नांडिस (विद्यार्थीप्रिय शिक्षक)
सन्मा. श्री बस्त्याव फ्रान्सिस फर्नांडिस, आपल्या आदर्शवत शिक्षक सेवेतून आपल्या वयोमानानुसार आज दि. ३० एप्रिल, २०२३ रोजी आपण समाधान पूर्वक निवृत्त होत आहात.
आपण निस्वार्थी ,शांततापूर्वक व आज्ञाधारकपणाने दर्जेदार दिलेल्या सेवेमुळे दि.आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संस्था आपली सदैव ऋणी असेल.
आपले निवृत्तीनंतरचे वास्तव्य चिंदर गावात असणारच आपणास जर निवृत्तीनंतर समाजाभिमुख काही कार्य तथा सेवा करायची असेल तर आम्ही आपणास संधी देऊ इच्छितो.
निवृत्तीनंतरचे आयुष्यमान आपल्या कुटुंबीयांसोबत निरोगी शांततापूर्ण व समाधानकारक होवो श्री रामेश्वर चरणी प्रार्थना.
आपली
दी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई
कार्याध्यक्ष
प्रदीप गोपाळराव परब मिराशी


